Blog updates

Latest news & updates
Updates

सावजी गणपती™ गणेशोत्सव – 2022

September 18, 2022

क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबले आहेत, अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते.

गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात. काही ठिकाणी तर जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते; परंतु याला अपवाद आहे ते सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज श्रीगणेशपूजा मंडळ. या मंडळाचे कार्यकर्ते कधीही कोणाला देणगी मागत नाहीत. क्षत्रिय गल्ली ही शहरातील मोठी बाजारपेठ; परंतु सर्व जण स्वताहून देणगी देतात.

सोलापूरच्या सोमवंशीय सहस्त्रार्जन क्षत्रिय समाज श्रीगणेश पूजा मंडळाच्या वतीने वतीने रामनवमी, तुकाराम बीज, एकनाथषष्ठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाची www.savjiganpati.com या नावाने वेबसाईट, तर एसएसके श्रीगणेश पूजा मंडळ, सोलापूर असे फेसबुक पेज आहे.

Spread the love

One comment

  1. NICE

    Reply

Write a Comment