Author: Prashant Habib

news

श्री गणेश जयंती उत्सव 2023

January 27, 2023
गणेश जयंती 2023
गणेश जयंती 2023
Ganesh Jayanti 2023

🛕🥥🥢श्री गणेश जयंती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, क्षत्रिय गल्ली, सोलापूर येथे बुधवार दि 25 जाने 2023 रोजी दुपारी 12 वा गुलाल टाकने व पाळणा आणि श्री गणेश याग पूजा व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाचे सदस्य 🌹 सौ व श्री प्रेम प्रभाकरसा झाड यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची विधी पार पडली. दुपारी महाप्रसाद वाटप झाले.

कार्यक्रमाला समाज ट्रस्टी, सर्व मंडळाचे सदस्य, महिला मंडळ, युवती प्रतिष्ठान सर्व गणेश भक्त महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 🙏

आपला,
‼️सावजी गणपती™‼️
🚩 श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर
➖♾️◆🚩◆♾️➖

Updates

सावजी गणपती™ गणेशोत्सव – 2022

September 18, 2022

क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबले आहेत, अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते.

गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात. काही ठिकाणी तर जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते; परंतु याला अपवाद आहे ते सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज श्रीगणेशपूजा मंडळ. या मंडळाचे कार्यकर्ते कधीही कोणाला देणगी मागत नाहीत. क्षत्रिय गल्ली ही शहरातील मोठी बाजारपेठ; परंतु सर्व जण स्वताहून देणगी देतात.

सोलापूरच्या सोमवंशीय सहस्त्रार्जन क्षत्रिय समाज श्रीगणेश पूजा मंडळाच्या वतीने वतीने रामनवमी, तुकाराम बीज, एकनाथषष्ठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाची www.savjiganpati.com या नावाने वेबसाईट, तर एसएसके श्रीगणेश पूजा मंडळ, सोलापूर असे फेसबुक पेज आहे.

Uncategorized

Savji Ganpati Trophy Season-3

December 6, 2019

Please Note

???? This year savaji Ganpati Trophy (season-3) will be played with limited 18 teams (i.e, 8 teams of local & 10 teams of other cities) so entry will be first come first serve basis applicable) ????????
-Savaji Ganpati Organising Committee